भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
पुणे राहटणी येथे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने १९ व्या भव्य वधू वर मेळावा २०२७ चे आयोजन करण्यात आले असल्याचे धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळविले आहे, रविवार दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूणे राहटणी थोपटे बॅंक्वटेस, येथे धनगर समाजातील सर्व पोटशाखेतील इच्छुक वधू वर साठी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या शिक्षित, उच्च शिक्षित मुला मुलींना अनुरूप, वधू वर निवडी साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर २०२६ असून या उपक्रमात समाज बांधवांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुकुंदराव कुचेकर यांनी केले आहे, या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी, नोंदणी साठी धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर ९६०४४२१३९७ यावर संपर्क साधावा.
मुंबई विभागातील नोंदणी साठी व अधिक माहितीसाठी पत्रकार भारत कवितके यांचेशी ८६५२३०५७०० या नंबर वर संपर्क साधावा, तसेच ऑनलाइन ९६७३८३६८९८ या व्हाट्सअप वर नोंदणी करावी.असे आवाहन अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी केले आहे.

