अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णप्रिया हॉल, अकलूज येथे बैठक मेळावा संपन्न झाला.
यावेळी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे बहुमूल्य मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने पदवीधर, शिक्षक मतदार, पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

