पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रत्येक चतुर्थी दिवशीश्रीक्षेत्र पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी बस सोडव्यात या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागणीनुसार संकष्टी चतुर्थी दिवशी पखालपूरसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत.अशी माहिती पंढरपूर आगार प्रमुख योगेश लिंगायत व जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
श्री क्षेत्र पखालपूर येथे प्राचीन,जागृत असे गणपतीचे मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्याठिकाणी प्रत्येक महिन्यात चतुर्थी दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
आक्टोबरमधील संकष्टी चतुर्थी" गुरुवार दि.२९ रोजी आलेली आहे.त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सकाळी सात पासून रात्रीपर्यंत श्रीक्षेत्र पखालपूर येथे जाण्या-येण्यासाठी जुन्या बस स्थानकापासून बससेवा सुरू करण्यात येत आहे.
तरी जाण्या-येण्यासाठी जेष्ठ नागरिक,महिला प्रवाशी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहा.वाहतुक अधिकारी पंकज तोंडे, स्थानक प्रमुख बाळासाहेब वाघमारे, नवनाथ दळवे, वाहतुक नियंत्रक अप्पा अष्टेकर,ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,प्रांत सदस्य विनोद भरते,सुभाष सरदेशमुख,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,जिल्हा सदस्य पांडुरंग अल्लापूरकर,तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचिव महेश भोसले,उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,आझाद अल्लापूरकर,कोषाध्यक्ष सागर शिंदे,सदस्य मंगेश देशपांडे,सागर कोळेकर,समाधान मेटकरी यांनी केले आहे.

