संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात ग्रंथालय विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज भारतरत्न डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि 'वाचनाचे महत्त्व आणि मानवी जीवन' या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.स्पर्धेचे परीक्षक व मुख्य व्याख्यात्या म्हणून श्रीमती नाझिया सय्यद उपस्थित होत्या.त्यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे जीवनातील महत्त्व सांगून उत्तम व बहुमोल मार्गदर्शन केले.वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - कु.राजनंदिनी कांबळे (प्रथम क्रमांक),कु. रजिया शेख (द्वितीय क्रमांक), कु.पायल कोळेकर (तृतीय क्रमांक) पटकवला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अमित घाडगे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा विस्तृत आढावा घेतला आणि त्यांच्या विचारांचा वारसापुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. जयशीला मनोहर यांच्या प्रास्ताविकाने झाली.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात 'वाचन प्रेरणा दिना'चे उद्दिष्ट आणि महत्त्व विशद केले.यानंतर ग्रंथपाल डॉ.ऋषी गजभिये यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या निकालाचे वाचन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रज्ञा बाबर व कु.स्नेहल वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु.श्वेता जाधव हिने मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

