अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
नवरात्र महोत्सवानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतीबा मंडपात सालाबादाप्रमाणे यंदाही देवी महात्म्य या पोथीच्या तीन दिवसीय पारायण सेवेस देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली आज मोठ्या भक्तीभावाने प्रारंभ करण्यात आले.
देवी महात्म्य या पारायण सेवेत अनेक महिला देवी भक्तांनी सहभागी होवून या सेवेचा लाभ घेणार आहेत.
या प्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मंदिर समितीच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली गेल्या ४० वर्षांपासून दरवर्षी ही पारायणसेवा अखंडपणे देवीच्या चरणी समर्पित होत आहे. नारी शक्तीची आराध्य दैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या नवरात्रीतील या देवी महोत्सवाच्या पारायण सेवेत अनेक महिला व माता भगिनी मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी होवून आपल्या जीवनात सुख-समाधान साध्य करुन घेतात असे प्रतिपादन करून यापुढेही दरवर्षी नवरात्रीच्या या उत्सवात व पारायण सेवेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून स्त्रीशक्तीचा सन्मान वाढवावा असेही आवाहन इंगळे यांनी यावेळी उपस्थित महिला भक्तांना केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सागर गोंडाळ, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, श्रीपाद सरदेशमुख, सिध्दाराम कुंभार, सुवर्णा जाधव, महादेव तेली यांसह अनेक भक्त उपस्थित होते, तर कार्यक्रम पार पडण्याकरिता विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, गिरीश पवार, रविराव महिंद्रकर, महेश मस्कले आदिंनी परिश्रम घेतले.

