माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
दिनांक २९/१०/२०२६ रोजी वेळापूर पोलीस ठाणे हददीतील मौजे वेळापूर येथील राहणारा अनिल अर्जुन बनसोडे रा. वेळापूर यांनी नंदनवन परमीट रूम वेळापूर येथे जावून मालक नागेश माने देशमुख यांना मी पत्रकार आहे "तुला जर परमीट रूम चालवयाची असेल तर, मला महिन्याला २०,०००/- रूपये हप्ता दयावे लागेल, नाहीतर तुला बार चालवू देणार नाही" असे म्हणून परमीट रूम मालकांनी हप्ता न दिल्याने अनिल बनसोडे यांनी बार मालकांस "तु मला आज खंडणी नाही दिल्यास आजच तुझे हातपाय तोडून तु कसे जिवंत राहतो बघतो" अशी धमकी दिलेबाबत बारमालक नागेश माने देशमुख यांनी दिले तक्रारीवरून वेळापूर पोलीस ठाणेस अनिल अर्जुन बनसोडे रा. वेळापूर ता. माळशिरस याचेविरूध्द गुन्हा दाखल झाले आहे.
दिनांक २९/१०/२०२६ रोजी अनिल बनसोडे हे पोलीस ठाणे येथे मदयार्काचे अंमलाखाली मोटार सायकल वरून आल्याने त्यांचेविरूध्द मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केले आहे.
वेळापूर पोलीस ठाणेस दाखल गुन्हयात अनिल बनसोडे यांना अटक करण्यात आले आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास पोहवा /१६६२ देशपांडे हे करीत आहेत.


