भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी गौरी व गणपती बाप्पा चे सर्वत्र मोठ्या उत्साहात जल्लोषात विसर्जन झाले.या मध्ये सार्वजनिक गणेश मूर्ती बरोबरच घरगुती गणेश मूर्तीचे व गौरी चे विसर्जन झाले.
ढोल ताशांच्या तालावर नाचत नाचत विभागातील व घरगुती गणेश मूर्ती चे विसर्जन झाले.कांदिवली गावठाण येथील तलावामध्ये अनेक गणेश मूर्ती व गौरी विसर्जन करण्यात आले.
कांदिवली पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे सर आणि वहातूक पोलीस अधिकारी वाघ सर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवक महिला व पुरुष यांची ठिक ठिकाणी नेमणूक केली होती, तर गावठाण तलाव येथील यंग स्टार क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते यांचे तलावातील विसर्जन कार्य कौतुकास्पद होते, आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी या तलावाच्या ठिकाणी भेट दिली तेव्हा यंग स्टार क्रीडा मंडळाचे सचिव नरेंद्र मुन्वाचार्य यांनी सांगितले की,"तलावातील मूर्ती विसर्जन कार्य सुरळीतपणे व सावधपणे चालू आहे, कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही."
शाळा कॉलेज चे विद्यार्थी विद्यार्थीनी नी गणेश भक्तांना योग्य मदत केली,आर दक्षिण मनपा आरोग्य विभागाच्या प्रथमोपचार केंद्रात गणेश भक्तांना मदत व मार्गदर्शन केले जात होते, एकंदरीत गौरी गणपती बाप्पा चे विसर्जन सर्वत्र मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदात भक्तीमय वातावरणात पार पडताना दिसत होते.

