मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
काल दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी न्यू इरा नाईट हायस्कूल घाटला, चेंबूर, मुंबई.तर्फे रात्र शाळेत नवीन प्रवेशासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आजी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
आजूबाजूच्या परिसरात फिरून चहाची टपरी, सामाजिक कार्यालय, गॅरेज, मेडिकल स्टोअर, रद्दीची दुकाने, भांड्यांची दुकाने, तिथे काम करणारे कामगारांना प्रवेशासंदर्भात महिती दिली. बाजारात फिरताना पसर्वांना प्रवेश पत्रके वाटण्यात आली. रात्र शाळेत कशा प्रकारे प्रवेश घेऊ शकता ही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यां आणि शिक्षक देत होते. कालच्या काल फिरताना कमीत कमी पाच प्रवेश निश्चित झाले. आणि काहींनी आम्ही शाळेत प्रवेश घेण्यासाठी येऊ असे सांगितले.
रात्र शाळा ही गरीब होतकरू, कामकरी, कष्टकरी ज्यांचे शिक्षण अर्धवट सुटले आहे त्यांच्यासाठी रात्र शाळा आहे. रात्र शाळेत शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. शिवाय सर्व शैक्षणिक साहित्य सुद्धा मोफत दिले जाते. तर वाट कसली पहाताय ज्यांचे पहिली पासूनचे शिक्षण सुटले आहे त्यांनी थेट आठवीच्या वर्गात आजचं प्रवेश निश्चित करा. *वयाची अट नाही* एकंदरीत रॅली यशस्वी झाली चंद्रकांत म्हात्रे यांच्या पुढाकाराने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच पाठीमागच्या आठवड्यात SMDC सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आजी माजी विद्यार्थी आणि सामाजीक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी शाळा वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु नवीन प्रवेशासाठी आम्ही आमच्या परीसरात फिरून प्रवेश मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
सभेचे मुख्य उद्देश पटनोंदणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत मिळवून देणे. शाळेचा विकास कसा होईल यासाठी शालेय विकास व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येते. अध्यक्ष स्थानी संस्थेचे सभासद आणि न्यू इरा नाईट हायस्कूल माजी मुख्याध्यापक चंद्रकांत म्हात्रे होते

