श्री क्षेत्र पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाची सुरुवात सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व सन्माननीय सदस्य.कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव साहेब.व्यवस्थापक प्रवीण कुमार गम.यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या संगीत महोत्सवाची सुरुवात संपन्न होत असताना आजच तिसर गायन पुष्प आकार पुणे निर्मित करावा विठ्ठल या सुरेल कार्यक्रमाने गुंफले .
सुरुवातीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य सद्गुरू श्री.भास्करगिरी महाराज. व्यवस्थापक प्रवीणकुमार घम आणि मान्यवर कलाकारांच्या शुभहस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न झाले. तसेच सर्व कलाकारांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी "करावा विठ्ठल" या गायन- नाट्यकृतीने पंढरपूरकरांना आगळावेगळा कार्यक्रम ऐकायला मिळाला. त्यामध्ये पंढरीच्या वारीचे खुप सुंदर रंजक कथा.आनंददायी वारी प्रत्येक वारकऱ्याला कशी आनंददायी होते यांच्या आठवणींनी वारी घडल्याची सर्व कलाकारांनी अनुभूती दिली.
यामध्ये आकार गृपमधील १४ कलाकार सामली होते त्यामध्ये प्रामुख्याने महेश पाटणकर,सिद्धा पाटणकर,स्वरदा गोसावी,धनंजय वेर्णेकर, स्वाती रांजेकर, सविता पेशवे, यशश्री पुणेकर,रूपाली बापट,अनाहिता रांजेकर यांनी सहभाग घेतला होता. पखवाजवर अविनाश तिकोनकर, तबल्यावर जितेंद्र पावगी आणि हार्मोनियमवर माधवी करंदीकर यांनी साथ केली आणि सुंदर कलाकृती सादर करत विठूराया चरणी आपली सेवा समर्पित केली.
या कार्यक्रमाची वेशभूषा तुलसी पाटणकर तर रंगभूषा संस्कृता वेर्णेकर यांनी केली होती. तर संकल्पना, लेखन, संगीत दिग्दर्शन महेश पाटणकर यांचे होते तर गद्य दिग्दर्शन धनंजय वेर्णेकर यांनी केले होते. यावेळी तिसऱ्या दिवशी पंढरपूर कलारसिक यांनी मोठी तुडुंब गर्दी करत या अविस्मरणीय मैफिलीचा आनंद लुटला.
पुढील २१-२२-२३ या पुढील ३ दिवसात मान्यवर ख्यातनाम गायक गायिकांची गायन सेवा समर्पित होणार असून सर्व कलारसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी वृंद अधिक परिश्रम घेत आहेत.

