वाडीकुरोली धोंडेवाडी प्रतिनिधी स्वप्नील जमदाडे तेज न्यूज
गणेशोत्सव २०२६ निमित्त वसंतराव काळे प्रशाला, वाडीकुरोली धोंडेवाडी येथे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’ चे तिसरे पुष्प अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात गुंफण्यात आले.शिक्षण प्रसारक मंडळचे सहशिक्षक डॉ. नवनाथ गोडसे हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते.
व्याख्यानाचा विषय आत्मविश्वास, शिस्त व कष्टाचा संघर्ष हा होता.गोडसे सरांनी आपल्या ओघवत्या शैलीत आत्मविश्वास आणि सातत्य हे रोजच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे, हे विविध कथा आणि जिवंत उदाहरणातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना "3 एडिट्स (3 Edits)" या चित्रपटाच्या संकल्पनेतून अभ्यास केवळ पाठ करण्यापेक्षा समजून घेण्यावर भर देण्याचा मोलाचा सल्ला दिला.
तसेच प्रशालेने सुरू केलेल्या 'आनंदी शनिवार' या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती
यावेळी विचारपीठावर प्रशालेचे प्राचार्य संजय कुलकर्णी , मॉडर्न हायस्कूल पिराची कुरोली चे मुख्याध्यापक समाधान काळे आणि प्रशालेचे पर्यवेक्षक कुमार गाजरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन दिलीप लिंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तात्यासाहेब सरडे यांनी केले.
या ज्ञानवर्धक कार्यक्रमाचा लाभ प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

