पंढरपूर प्रतिनिधी रामदास नागटिळक तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील चळे दर्लिंग आट्यापाट्या संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आट्यापाट्या सामन्यांमध्ये कौठाळी येथील जय हनुमान आट्यापाट्या संघाने प्रथम क्रमांकाचे 21 हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले
या संघामध्ये प्रशांत नागटिळक,कैलास नागटिळक,सोमनाथ सप्ताळ, प्रवीण कांबळे, सचिन नागटिळक, तेजस कदम या खेळाडूंनी सहभाग घेतला. विजयी संघाचे कौठाळी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

