लातूर प्रतिनिधी तेज न्यूज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा आणि निलंगा तालुक्यातील जाऊ येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती, झालेल्या नुकसानीची तीव्रता आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
खरोसा येथे पाहणीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. पावसाअभावी तसेच प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांवर झालेला परिणाम त्यांनी जाणून घेतला.
यानंतर निलंगा तालुक्यातील जाऊ येथेही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि नुकसानीची माहिती घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

