समाजासाठी तत्परतेने झटणार एक उमद व्यक्तिमत्त्व ' गुरुनाथ तिरपणकर
समाजात अशी काही माणस असतात कि ती दुसऱ्यानी काही समाजासाठी केल तर अश्या माणसांचा ' भक्तींचा आणि कलाकारांचा गौरव घडवून आणतात . त्यानी केलेल्या कार्याचा समाजाला धडा मिळावा समाजातून अशी रत्ने जन्माला यावीत जेणेकरून समाज सुसंस्कृत व्हावा . मागील नव्या पिढी ने त्यातून उदबोधन घ्याव आणि समाज रचनेचा हा आरसा आणखी झळझळून उठावा . नव्या पिढीनं अश्या कार्यक्रमातून बोध घ्यावा त्यांच्या ही मनातून सामाजिक ,सांस्कृतिक , शैक्षणिक प्रतिबिंबाचे कवडसे सतत पडत राहोत आणि समाजाची सर्वतोपरी प्रगती व्हावी हाच एकमेव उद्देश त्या पाठिमागे ठेवणाऱ्या समाजातील काही कृतज्ञता जवळ बाळगणाऱ्या व्यक्ती या समाजात असतात त्याच सामाजिक प्रेरणेने कार्य करत असतात , सामाजिकतेचा वसाच जणूकाही त्यानी चिरंतरपणे घेतलेला असतो , या समाजाला प्रेरणा देण्याच काम करणाऱ्या स्वयंसेवी व्यक्तीपैकी एक असामान्य अन कायम समाजात सामाजिक मुल्यांच दान देणा्री अशी एक व्यक्ती ..... तीच नांव श्री . गुरुनाथ तिरपणकर होय !
नांवाप्रमाणे कनक वल्ली असणाऱ्या कणकवलीतल असामान्य व्यक्तिमत्त्व . मी एक कणकवली मधला लेखक , पूर्वी वर्तमानपत्रातून काही लेख ' का व्य लिहिलेले असलं तरी सध्या काही ही मी करत नाही परंतू गेले दिड दोन महीन्यात मी श्री. गुरुनाथ तिरपणकर सरांच कार्य बघुन अक्षरशः अवाक झालो. अन त्यामुळेच मी पुन्हा लिहीता झालो .
दिड एक महिन्यापूर्वी सिंधुदुगातील दशावतारी स्त्री भूमिका करणाऱ्या श्री . दळवी या कलाकाराचा सत्कार श्री . गुरुनाथ तिरपणकर सरांनी त्याच्या घरी जावून केला . त्यानंतंर आठच दिवसात कोकणातील कणकवली त महिला दशावतारी ५० ते ६० दशावतारी कलाकारां या गणेशमूर्ती व आपल्या संस्थेची प्रशस्तीपत्रके देवून सत्कार केला .
सदर मोठ्या सत्कार कार्यास मुंबईवरुन खास जन जागृती सेवासंस्थेचे सल्लागार श्री . अरविंदजी सुर्वे साहेब व मी हि उपस्थित होतो . कोकणातील दशावतारी महीला कलाकारांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला पहिलाच सत्कार घडवून आणण्याच एकमेव श्रेय हे श्री . तिरपकर सरांकडेच जात एवढ मात्र नक्की . चार दिवसात वेंगुर्ले सावंतवाडीत शिक्षक दिनांचा सत्कार सोहळ्याला आयोजन करून उपस्थित तिरपणकर सरांची बातमी वाचून मी चक्रावलो इतक्यात दोन दिवसानी कणकवलीत माझे मित्र अभिनेता श्री . अभय खडपकर व श्री . साखरे कंट्रोलर यांच्या हस्ते श्री . गणरायाच्या आरती संग्रहाचा प्रकाशन समारंभ मोठ्या थाटात पार पडला . आता तरी चतुर्थी मध्ये श्री. तिरमणकर साहेंबाची भेट घ्यायचा विचार मी करत असतानाच बातमी वाचली . कोंडमळा तालुका चिपळूण येथील गणेश 'विसर्जन सोहळ्यातील उपस्थिताना जनजागृती सेवा संस्थेच्या मार्फत गणेश भक्तगणाना खावू फराळाचं वाटपं !
काही काही माणसं हि समाजसेवेचा वसा घेवूनच जन्माला आलेली असतात. थांबण हे त्यांना माहीतच नसतं याच कारण थांबला तो संपला या युक्तीवादावरच अश्या व्यक्तींचा भरवसा असतो . समाजातल्या कार्यप्रवण असणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या प्रवृत्त करणाऱ्यांना उमेद देणाऱ्या व्यक्ती याच तर खर समाजमनाच्या आरसा असतात . समाजाला उदबोधक अस कार्य करणाऱ्या लोकांचा , माणसांचा व्यक्तींचा सत्कार करताना त्यांचा सत्कार करणारेच खर तर सत्कारमूर्ती असतात कारण रत्न पारख्यालाच तर रत्नाची किंमत कळत असते ना? ....
आणि श्री गुरुनाथ तिरपणकर सरांसारखे च रत्नपारखीच तर रत्नासारखा समाज घडवण्यासाठीच जन जागृतीचा वसा घेवून समाज घडविणेच काम करत असतात . अश्या या समाज रत्नपारख्यास माझा सलाम !
लेखन - डॉ. विठ्ठल गाड
महाराष्ट्र राज्य 2 पुरस्कार प्राप्त . जेष्ठ साहित्यिक कणकवली सिंधुदुर्ग .

