भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एलआयसीचे विकास अधिकारी बी. एस. चौगुले व तेज न्यूज परिवार यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, आज स्पर्धेतील सहभागासाठी शेवटचा दिवस आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ₹१,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹७०० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹५०० रोख पारितोषिकासह सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरगुती सजावटीतून सामाजिक संदेश देणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाळवणीतील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक प्राची माळवदे यांनी केले आहे.


