पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मराठा सेवा संघ शाखा पंढरपूर यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धनंजय धोत्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवेबद्दल ‘कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे तसेच माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ. शुभम आगावणे यांच्या शुभहस्ते धनंजय धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि निष्ठेने सेवा बजावल्याबद्दल धोत्रे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवर व नागरिकांनी धनंजय धोत्रे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेज न्यूज परिवाराच्या वतीने धनंजय धोत्रे यांना ‘कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार’ मिळाल्या बद्दल अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.


