सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१, रिजन-१ यांच्या वतीने आयोजित GAT व LCIF कॉन्क्लेव्ह रविवार, २३ ऑगस्ट रोजी डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या सेवा कार्याला अधिक प्रभावी दिशा देणे, सदस्यवाढीस चालना देणे, नेतृत्वगुण विकसित करणे तसेच लायन्सच्या विविध उपक्रमांची माहिती पदाधिकारी व सदस्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
Bरिजन चेअरमन पीएमजेएफ लायन डॉ. महेश नळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन राजेंद्र शहा-कासवा, द्वितीय उपप्रांतपाल एमजेएफ लायन मंगेश दोशी, डिस्ट्रिक्ट जीएमटी समन्वयक लायन ॲड. श्रीनिवास कटकूर, जीएसटी समन्वयक एमजेएफ लायन सर्जेराव पाटील, जीईटी समन्वयक एमजेएफ लायन कल्पेश मालू, एलसीआयएफ समन्वयक एमजेएफ लायन अतुल सोनिग्रा, मल्टिपल जीएसटी समन्वयक पीएमजेएफ लायन दिलीप मोदी, माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन एमजेएफ लायन द्वारका जालन तसेच झोन चेअरमन लायन अमिता कारंडे, लायन प्रा. स्वामिनाथ कलशेट्टी, लायन डॉ अर्चना आवटे, लायन उन्मेष आटपाडीकर रिजन एक फर्स्ट लेडी लायन प्रीती नळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाच वर्षीय कुमारी प्रिशा नळे हिच्या नवकार महामंत्राने झाली. त्यानंतर रिजन-१ अंतर्गत १६ लायन्स क्लबच्या परमनंट प्रोजेक्ट फलकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रिजन चेअरमन लायन डॉ. महेश नळे यांनी प्रास्ताविकातून सदस्यत्ववाढ, नेतृत्व विकास, सेवा उपक्रम आणि लायन्स संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी या प्रशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शहा-कासवा यांनी GAT कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून लायन्स परिवारातील सर्व पदाधिकारी व सदस्यांमधील संबंध अधिक दृढ झाले पाहिजेत, यासाठी अशा परिषदांची आवश्यकता असल्याचे सांगितले. संघटनेच्या माध्यमातून प्रभावी सेवा कार्य करण्यासाठी परस्पर समन्वय व सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रांताकडून सर्वतोपरी सहकार्य व शुभेच्छा व्यक्त केल्या.
माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन द्वारका जालन यांनी नेतृत्व कौशल्य, मार्केटिंग व ब्रँडिंग या विषयावर मार्गदर्शन केले. प्रत्येक क्षेत्रात मार्केटिंग आवश्यक असून आजच्या काळात ब्रँडवरील विश्वास महत्त्वाचा आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रभावी संवादातून चांगले ब्रँडिंग करता येते. याच पद्धतीने लायन्स क्लबची तसेच स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण करता येते. त्यासाठी स्पष्टपणा, सुसंवाद आणि इतरांना प्रभावीपणे समजावून सांगण्याचे नेतृत्व कौशल्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मल्टिपल जीएसटी समन्वयक पीएमजेएफ लायन दिलीप मोदी यांनी लायन्स क्लबचे विविध प्रकार व क्लब विकास या विषयावर पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. विविध उदाहरणे व स्वानुभवातून त्यांनी लायन्स क्लबच्या विविध सेवा कार्यांची माहिती प्रशिक्षणार्थींना दिली. यानंतर जीएमटी समन्वयक लायन ॲड. श्रीनिवास कटकूर, जीईटी समन्वयक लायन कल्पेश मालू, जीएसटी समन्वयक लायन सर्जेराव पाटील आणि एलसीआयएफ समन्वयक लायन अतुल सोनिग्रा यांनी आपापल्या विभागांच्या कार्यपद्धती व उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.
लायन मंगेश दोशी यांनी रिजनमधील बंद पडलेल्या लायन्स क्लबकडे विशेष लक्ष देऊन ते पुन्हा कार्यरत करण्याचे आवाहन केले. ज्या क्लबकडे परमनंट प्रोजेक्ट आहेत, त्या क्लबचे सदस्य संघटनेत टिकून राहण्यास मदत होते, त्यामुळे अशा प्रकल्पांना अधिक बळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आय हॉस्पिटल व ब्लड सेंटरशी संबंधित क्लबमध्ये सदस्यसंख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील ११ क्लबच्या माध्यमातून अधिक प्रभावी काम करण्यासाठी सदस्यवाढ करणे, पंचायत समितीच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाशी संपर्क साधून सेवा कार्य करणे, लायन क्वेस्ट उपक्रम राबविणे तसेच लायन्स क्लबच्या वतीने पिक्स पोस्टर कॉन्टेस्टसारखे उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जीएमटी समन्वयक ॲड. श्रीनिवास कटकूर यांच्या वतीने सदस्यवाढीत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या झोन चेअरमन व क्लब अध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपविभागीय सभापती लायन प्रा. स्वामिनाथ कलशेट्टी यांच्या झोनचा जुलै महिन्याचा वार्तांकनं प्रकाशन करण्यात आला.
परिषदेत सहभागी सदस्यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. संपूर्ण आयोजन, वेळेचे अचूक व्यवस्थापन, मान्यवरांचे आदरातिथ्य, व्यासपीठाची आकर्षक सजावट आणि कार्यक्रमातील शिस्त यामुळे आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिजन सचिव लायन गंगाप्रसाद बंडेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिजन-१ मधील फर्स्ट लेडी लायन प्रीती नळे,माजी प्रांतपाल, कॅबिनेट अधिकारी, उपविभागीय सभापती, झोन चेअरमन, क्लब अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच लायन्स सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

