मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. ली. या साखर कारखान्याने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या असे प्रतिपादन ना. ॲड.राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.
ना. नार्वेकर यांच्या शुभहस्ते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कारखान्याचे मार्गदर्शक समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीजमध्ये उभारण्यात येणाऱ्या १२ TPD क्षमतेच्या CBG (Compressed Bio-Gas) प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज वितरणाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. या प्रकल्पामुळे ऊर्जानिर्मिती, पर्यायी इंधन आणि शेतीपूरक उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार असून, उपलब्ध संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. मंगळवेढा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
यावेळी श्री संत दामाजी मंदिर संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे, नगरसेवक सोमनाथ आवताडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, प्राचार्य डॉ.बी पी रोंगे, नगरसेवक प्रसाद कळसे, माजी सभापती दिलीप गुरव, सभापती दिपाली ताड, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उपसभापती विजयसिंह देशमुख, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, सरव्यवस्थापक सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, रमेश भांजे, बापूराया चौगुले, विनायक यादव, माजी संचालक राजन पाटील, द्रोणाचार्य हाके, विजय माने, त्याचबरोबर कारखाना विविध खात्यांचे खाते प्रमुख, पदाधिकारी कर्मचारी आदी मान्यवर तसेच शेतकरी उपस्थित होते.
मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागात अशा आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी होणे ही काळाची गरज आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना बळ मिळण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि शेतकरी, उद्योग व पर्यावरण यांचा समतोल साधत परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. मंगळवेढ्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी अशा प्रकल्पांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न राहील असेही ना. नार्वेकर यांनी सांगितले.

