सोलापुर प्रतिनिधी तेज न्यूज
शनिवार दि १० ऑक्टोंबर २०२६ रोजी भाद्रपद मासातील सर्वपित्री दर्श अमावस्या होती. या दिवशी पुणे बारामती सातारा परिसरात भादवी बैल पोळा सादर करण्याची परंपरा देखील आहे.
या सर्वपीत्री अमावस्येला प्रारंभ शुक्रवारी रात्री ९ वा ३५ मि झाला तर समाप्ती शनिवारी रात्री ९ वा १९ मि झाली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी आई तुळजाभवानी मातेची निद्रा काळ समाप्ती देखील झाली .त्यामुळे आजच्या दिवसाला गजछाया योग होता .
या निमीत्त कर्णीक नगर येथील शिळारुपी शनैश्वर देवस्थान येथे पहाटे पासूनच तैलाभिषेक, नवगृह पुजा, गणेश पुजा, होम हावन , लघु रूद्रा भिषेक आदी धार्मीक कार्यक्रम परंपरे नुसार पार पडले
शिवाय सकाळी ८ वाजता व दुपारी १२ वा ( मध्यान्ह) महाआरती संपन्न झाली .आजची महाआरती शनैश्वर देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सुरेश बापू गायकवाड व वरदान राजे गायकवाड याच्या शुभहस्ते पार पडली.
यावेळी ऑड गायकवाड यांनी या शनैश्वर शक्ती स्थळाचे महात्म्य सांगून राज्यातील दुष्काळाचे सावट टळावे म्हणून देखील शनैश्वराला साकडे घातले.
कार्यक्रमाचे पौर्यहित्य राजु कोडम आदींनी केले तर व्यवस्थापना करिता ॲड सुनिल क्षीक्रसागर, प्रभाकर फलमारी, रतन गायकवाड, सुनिल कुमठेकर, विश्वास शिंदे,प्रभाकर यादगिरी आदींनी परीश्रम घेतले. संपुर्ण दिवसभर शनी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दि केली होती.

