पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
सध्या पंढरपूर तालुक्यांमध्ये डेंगूची साथ महाभयंकर सुरू आहे. आरोग्य प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
घरोघरी जाऊन सर्वे होणे अपेक्षित असताना आरोग्य सेवक हे आशा वर्कर यांना कामे सांगून ते निवांत फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही अशी गंभीर परिस्थिती असताना प्रशासन मात्र शांत स्थितीत काम करत आहे.
यामध्ये सर्वांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ लक्ष घालावे. पंढरपूर तालुक्यात डेंगूची साथ वाढत चाललेली आहे.त्यावरती आळा बसवणे गरजेचे आहे.
नुसते कागदोपत्री आदेश देण्यात काही एक अर्थ नाही प्रॅक्टिकली काम होणे गरजेचे आहे. व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्षात काम होते का नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.
मा सभापती/मा. उपसभापती/BDO व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदर चालू असलेल्या डेंगूच्या गंभीर साथी बाबत आपण स्वतः गंभीर व्हावे व कार्यवाही करावी. अशी मागणी ज्योती शिवाजी पांढरे सदस्या-पंचायत समिती,पंढरपूर यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.

