पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, गोपाळपूर यांचे मार्फत "ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा 2026" चे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेतील शिक्षक राजेंद्र जाधव, कलाध्यापक श्रीकांत चंदनशिवे, नितीन वायदंडे व शिक्षिका अंजली बोधले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना घोषित झाल्याचे स्वेरीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर यांनी सांगितले.
संस्था व प्रशालेचे नाव उज्वल करणाऱ्या शिक्षकांचा आम्हाला सार्थ अभिमान असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर, मुकुंद गिरी, सुनीता मोरे, प्राचार्य अविनाश कटकधोंड आदींनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

