भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना, तसेच प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला व पुरुष यांचा सन्मान करुन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात येणार आहे,या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लवकरच नाशिक शहरात करण्यात येणार आहे.
३१ मे १७२५ मध्ये चौंडी येथे जन्मलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंतीनिमित्त आणि त्यांच्या समाज सेवा, लोककल्याण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अभिवादन म्हणून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुषांनी या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
सामाजीक कार्य, शिक्षण,दिव्यांन सेवा, महिला सक्षमीकरण, आरोग्य,कला, क्रीडा, उद्योग व्यवसाय, पर्यावरण, कृषी, तसेच समाज हितासाठी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असल्याचे मुख्य आयोजक सौ.शिल्पाताई झारेकर यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळविले आहे.
आपले पुरस्कार प्रस्ताव आपल्या परिचयासह, कार्याची संक्षिप्त माहिती उपाध्यक्षा सौ.शिल्पाताई झारेकर ( ७७७५८९३१८६),अरुणाताई दरगुडे (९४०३२३४७४१), रंगनाथ दरगुडे (७३८५८६४६४१) , यांच्या कडे पाठवावी असे आवाहन श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी व्दारा कळविण्यात आले आहे.

