अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातील सत्काराच्या माध्यमातून मला मिळालेले स्वामींचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे असल्याचे मनोगत सोलापूर येथील सुप्रसिध्द सर्जन डॉ.एस.एम.दामा यांनी व्यक्त केले. नुकतेच डॉ.एस.एम. दामा यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे श्रीशैल गवंडी यांनी डॉ.एस.एम.दामा यांचा श्री स्वामी समर्थांचे शाल, श्रीफळ, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी डॉ.एस.एम.दामा बोलत होते. मंदिरात स्वामींच्या प्रतिमेसमोर झालेल्या या सत्काराला अनुसरून पुढे बोलताना डॉ. दामा म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रात काम करताना एक सर्जन म्हणुन स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने रुग्णसेवा करण्याची प्रेरणा मिळते. मी आयुष्यभर स्वामींच्या मार्गाने चालून जनतेची सेवा करत राहीन यासाठी स्वामींचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे असल्याचे विशेष उल्लेखही डॉ.दामा यांनी केला.
यावेळी डॉ.हिरण्णा पाटील, संजय पवार, गिरीश पवार, रमेश शिंदे सर, विपूल जाधव, सागर गोंडाळ आदींसह स्वामी भक्त आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

