पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील वॉर्ड क्रमांक १५ विस्थापित नगर येथे नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच परिसरातील भागातील पाहणी केली.
यावेळी परिसरातील पाणी, रस्ता, अस्वच्छता व परिसरातील परिस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
नागरिकांची अडचण हीच माझी अडचण आणि त्यावर तातडीने उपाययोजना करणे हीच माझी जबाबदारी!”डॉ. सौ. प्रणिताताई भालके यांनी सांगितले.

