अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
यंदाच्या श्रावणमासा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
श्रावण मासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ (अंबड) जि.जालना यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प.मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशीव) यांचे गीता पठण. तिसऱ्या सप्ताहात ह.भ.प. योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर
(श्री क्षेत्र गोंदी) जि.जालना यांचा गोकुळ अष्टमी व गोपाळकाल्या निमित्त कीर्तन सेवा तर चौथ्या सप्ताहात लातूर येथील ह.भ.प.श्रीमंत पांचाळ यांचा हरीपाठ व रामकथा सप्ताह इत्यादी कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत संपन्न होतील. श्रावण मासातील प्रत्येक श्रावण सोमवारी नित्यनियमाने होणारी श्रींची नैवेद्य आरती ११ : ३o वाजता न होता सायंकाळी ५:३० वाजता होईल, व आरतीनंतर देवस्थानकडुन प्रसाद वाटप करण्यात येईल, तदनंतर रात्रीची शेजारती होणार नाही याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.
श्रावण मासानिमित्त वरील प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कथा, कीर्तन, भक्तीसंगीत, भजन, गीता पठण सेवा देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात ४ ते ७ या वेळेत नियोजीत तारखेस व वेळेवर सुरुवात होणार असून सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

