पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे उद्योजकता आणि स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी इंटरपुनरशिप डेव्हलपमेंट सेल Entrepreneurship Development Cell (EDC) आणि इन्स्टिट्यूटेशन इनोवेशन कौन्सिल Institution’s Innovation Council (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने इफेक्टिव्ह सेल्स अँड मार्केटिंग स्ट्रॅटरजीज फॉर इंटरपृनरस /स्टार्टप्स
(Effective Sales and Marketing Strategies for Entrepreneurs/Start-ups) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी चंद्रकांत रामचंद्र लोंढे, अनुभवी इंडस्ट्री प्रोफेशनल आणि बिझनेस कन्सल्टंट, हे रिसोर्स पर्सन (Resource Person) म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच विशेष अतिथी म्हणून सिंहगड लोणावळ्याचे प्राचार्य डॉ.डी.एस.मंत्री यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत उद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी प्रभावी विक्री तंत्रे, ग्राहकांच्या गरजा ओळखणे, बाजारपेठेचे विश्लेषण, मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करणे, ब्रँडिंग, ग्राहकांशी प्रभावी संवाद, उत्पादनाचे प्रभावी सादरीकरण आणि विक्री वाढविण्यासाठी आधुनिक विपणन पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावसायिक दृष्टिकोन समजून घेता यावा, तसेच त्यांच्या उद्योजकीय कौशल्यांचा आणि स्टार्ट-अपच्या संकल्पनांचा विकास व्हावा, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमासाठी इंक्युबॅशन मॅनेजर डॉ.अतुल आराध्ये, ईडीसी सेल इन्चार्ज श्री. अतुल कुलकर्णी , आय आय सी व्हाईस प्रेसिडेंट श्री. दत्तात्रेय कोरके, उपप्राचार्य तथा आय आय सी प्रेसिडेंट डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, उद्योजकीय दृष्टिकोन, स्टार्ट-अप क्षमता आणि उद्योगाभिमुख कौशल्यांना चालना देण्यासाठी EDC व IIC च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
इ डी सी विद्यार्थी वाईस प्रेसिडेंट अस्मिता राजाराम कोडलिंगे व ऐश्वर्या रामचंद्र काशीद यांनी सूत्रसंचालन करून मान्यवरांचे आभार मानले.

