अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांची कीर्ती जगभर पोहोचवण्याचे काम सारांश विशेष अंकाच्या माध्यमातून होईल असा विश्वास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केला.
मिरज येथील स्वामी भक्त अनिल दबडे यांनी संपादित केलेल्या श्री स्वामी समर्थ विशेषांकाचे प्रकाशन येथील श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींच्या गाभाऱ्या समोर झाले तेव्हा ते बोलत होते.
दैनिक संचारचे मुख्य वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, कवी मारुती कटकधोड, संपादक अनिल दबडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी महेश इंगळे यांनी विशेष अंकाच्या गुणवत्तेचे भरभरून कौतुक केले. अंकातील प्रत्येक लेख वाचनीय आहेत असे ते म्हणाले. यावेळी नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते संपादक अनिल दबडे यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी स्वामी भक्त सखुबाई दबडे, संगीता दबडे, ऋषभ देव, ज्ञानेश्वर आवटी, मंदिर समितीचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, व्यंकटेश पुजारी आदीसह भाविक भक्त उपस्थित होते.

