पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
करमाळा (जि. सोलापूर) येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संतोष मुळे आणि संघटक पदी कैलास धोकटे यांची निवड झाल्याबद्दल श्री संत नामदेव शिंपी समाज, करमाळा शिंपी समाज पंच वाडा या संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष मुळे म्हणाले, _"तुमच्या या प्रेमळ सत्कारामुळे मी आज प्रेमाने न्हाऊन निघालो आहे. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मी कटिबद्ध राहीन."_
याच कार्यक्रमात त्यांनी महत्त्वाच्या दोन नियुक्त्या जाहीर केल्या. श्री संत नामदेव शिंपी समाज सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत चुंबळकर आणि सोलापूर जिल्हा सल्लागार पदी रवींद्र वनारसे यांची निवड जाहीर करण्यात आली.
या सत्कार समारंभास शिंपी पंच वाड्याचे खजिनदार व विश्वस्त रामचंद्र बोधे, ज्येष्ठ सल्लागार व विश्वस्त पांडुरंग गाठे, विश्वस्त राजेंद्र गानबोटे, विश्वस्त शशिकांत वनारसे यांच्यासह शिंपी पंच वाडा विश्वस्त मंडळातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

