पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव दुमाला केंद्र बाभुळगाव येथील आदर्श उपक्रमशील विद्यार्थी शिक्षिका म्हणून सर्व परिचित असलेल्या महानंदा सावंत यांचा प्रेरणादायी संघर्ष असून त्यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत आहे. त्यांनी गेली 35 वर्ष त्यांनी अविरतपणे अतिशय उत्कृष्ट असे ज्ञानदानाचे कार्य केले असून अनेक पिढ्यांना त्यांनी संस्कार दिले आहेत. असे मत पंढरपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉक्टर बिभीषण रणदिवे यांनी व्यक्त केले. ते शिक्षिका महानंदा सावंत यांच्या सेवा पूर्तीच्या सोहळ्यानिमित्त बोलत होते. आपल्या सारख्या अनुभवी गुणवंत व आदर्श शिक्षिका सेवानिवृत्त होत असल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे असे मत व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक शरद कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सावंत यांच्या आदर्श शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला आणि त्यांनी 8 वर्षे शाळेमध्ये स्वतःला झोकून देऊन तन,मन धनाने उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केले. सेवानिवृत्तीचे उंबरठ्यावर असतानाही न थकता न थांबता जे उपक्रम केले त्या सर्वांचे कौतुक करून त्यांना पुढील उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
उपशिक्षक सुनील कोरे यांनी आपल्या मनोगता मध्ये सावंत मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या कार्यपद्धतीचा गौरव करून त्यांनी ज्या संघर्षातून शिक्षण घेऊन लग्नानंतर डीएड करून स्वतःच्या पायावर उभे राहून अनेक पिढ्या घडवल्या हजारो विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देत त्यांना ज्ञानदान केले. 35 वर्षाच्या सेवेमध्ये शेकडो माणसे जोडून अतिशय आनंदाने त्यांनी नौकरी केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सोलापूर जिल्हा परिषद,पंढरपूर तालुका व अनेक सामाजिक संघटनेने त्यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित केले आहे.अशी माहिती सांगून तुम्ही जरी शिक्षण शैक्षणिक क्षेत्रातून सेवानिवृत्त होत असाल तरी आमच्या मनातून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातून कधीच सेवानिवृत्त होणार नाही असे मत व्यक्त करुन त्यांना पुढील उदंड निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारास उत्तर देताना शिक्षिका महानंदा सावंत यांनी आजपर्यंत पाच शाळेवरती केलेल्या सेवेचा मागोवा घेत प्रत्येक शाळेवरती गावकरी पालक व शिक्षक बंधू भगिनी यांनी केलेले सहकार्य दिलेली साथ मी कधीच विसरणार नाही असे सांगून 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सेवानिवृत्त होत असली तरीही मी माझ्या सहकारी बांधवांना कधीही विसरणार नाही असे मत व्यक्त करून पाणावलेल्या डोळ्याने सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी सावंत यांची नात अधिरा जाधव हिने आता आजीबरोबर मी 24 तास राहणार याचा आनंद व्यक्त करून आजीला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
या सेवापूर्ती सोहळ्या प्रसंगी शाळेतील पदवीधर शिक्षक शामराव जाधव जगन्नाथ ओव्हाळ मुख्याध्यापक अशोक कांबळे पुरुषोत्तम जाधव कन्या पल्लवी जाधव, बहिण सुजाता वाघमारे तसेच शाळेतील विद्यार्थी गौरी आटकळे समृद्धी अटकळे यांनी सावंतच्या कार्याचा गौरव करून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव दुमाला यांच्यावतीने सावंत व सुधाकर सावंत या उभयंतांचा यथोचित सन्मान करून त्यांना गटशिक्षणाधिकारी डॉक्टर बिभीषण रणदिवे सरपंच जय लक्ष्मीताई माने माजी सरपंच निवृत्ती दादा आटकळे प्रकाश दादा घोडके मुख्याध्यापक शरद कोळी,सुनील कोरे, शिक्षिका जयश्री राऊत,वैशाली वाघमारे,सुप्रिया कांबळे,शामराव जाधव व जगन्नाथ ओव्हाळ यांच्या शुभहस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यानिमित्त बाभुळगाव केंद्रातील उपस्थित सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांनी शाळेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी शेगाव दुमाला गावच्या सरपंच जयलक्ष्मी माने माजी सरपंच निवृत्ती दादा आटकळे प्रकाश दादा घोडके लखन गायकवाड अश्विनी गायकवाड व केंद्रातील मुख्याध्यापक संतोष कांबळे आवेश करकमकर एकनाथ जाधव सुरेखा इंगळे आशाबाई घाडगे उत्तम बंडगर मु़लगा उमेश सावंत केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन बालाजी शिंदे उत्तरेश्वर माळी वैशाली जगताप,अश्विनी तावस्कर,भाग्यश्री अवधूत आदी शिक्षक बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार व उत्कृष्ट सूत्रसंचालन शहाजी देशमुख यांनी केले.

