भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
एप्रिल 2026 मध्ये झालेल्या इयत्ता 4 थी शिष्यवृत्ती परीक्षेत भाळवणी मुलींच्या शाळेने दैदीप्यमान असे यश मिळवले व सोलापूर जिल्ह्यात मनाचे स्थान मिळवले आहे.
या परीक्षेसाठी एकूण 35 विध्यार्थिनी बसल्या होत्या त्यापैकी 21 विध्यार्थिनी पात्र ठरल्या आणि 10 विध्यार्थिनी गुणवत्ता यादीत आल्या आहेत.
यामध्ये कु. ओवी अजित लिंगे 282गुण मिळवून राज्यात 8 वीआली.
कु. रुंजी समाधान देठे 272 गुण जिल्हा गुणवत्ता रँक 4
कु. शिवंण्या गणेश पिसे 268 गुण जिल्हा गुणवत्ता रँक 10
कु. प्रणिती जयंत शिंदे 252 गुण जिल्हा गुणवत्ता रँक 90
कु. प्राजक्ता सतीश लिंगे 250 गुण जिल्हा गुणवत्ता रँक 106
कु. उपासना सचिन शिंदे 246 गुण जिल्हा गुणवत्ता रँक 161
कु. अल्फीया समीर मुजावर244 गुण जिल्हा गुणवत्ता रँक 173
कु आरोही विश्वास बोधे 242 गुण जिल्हा गुणवत्ता 195
कु. राजकन्या नितीन कांबळे 234 गुण जिल्हा गुणवत्ता 303रँक
कु. आनंदी अभयसिंह कलढोणे 234 गुण
जिल्हा गुणवत्ता रँक 297
या सर्व यशस्वी मुलींना आदर्श शिक्षिका श्रीमती महानंदा भगवान साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
संध्याकाळी ८वाजेपर्यंत तसेच सुट्टीच्या दिवशी जादा तास घेऊन रेकॉर्ड ब्रेक केले.
यशस्वी मुली आणि मार्गदर्शक शिक्षिका यांचे शा. व्य. स. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीकादर शेख , गटशिक्षणाधिकारी . रणदिवे , विस्ताराधिकारी श्रीमती शारदा रासकर , केंद्रप्रमुख सतीश शिंदे , मुख्याध्यापक सुरेश शिंदे , सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.

