सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स सेंट्रलच उत्तुंग कार्य 'लायन यही धर्म अपना अविरत सेवा का सपना "! हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सेवा आणि प्रशासन या दोन्ही स्पर्धांमध्ये नवोपक्रमशील, वैभवशाली व ऐतिहासिक कामगिरी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल चे अध्यक्ष प्रा.ला. स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाला,सचिव ला दिनानाथ धुळम व कोषाध्यक्ष ला.सी ए श्रेणिक शहा यांच्या नियोजनपूर्वक परिश्रमांना मोठे यश मिळाले.
शैक्षणिक आध्यात्मिक व समाजसेवेचा अखंड ध्यास,प्रशासनातील शिस्त,नियोजनातील परिपूर्णता आणि एकजुटीची अप्रतिम सांगड घालत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलने सन 2025 -26 या वर्षात इतिहास घडवणारी दैदिप्यमान कामगिरी केली आहे. वर्षभरातील प्रशासकीय कार्य सेवा कार्य यामध्ये शतकोत्तर रजत उपक्रम राबवून इतिहास घडविला.आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी क्लबचे मुखपत्र काढले.लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D-1 च्या सन 2025-26 गोवा येथील श्री संगम डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये आपल्या क्लबचा अविस्मरणीय असा अपूर्वऐश्वर्य स्मरणिकेचे प्रकाशन करून आपल्या क्लबचें नावलौकिक केले. वर्षभरच्या सेवा कार्यात 4750 गुण तर प्रशासकीय कार्यात 6840 गुण मिळवत उत्तुंग यश संपादित करत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलने एक उल्लेखनीय यश प्राप्त केले. ही कामगिरी क्लबच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंदविला यात तिळमात्र शंका नाही.
या यशामागे क्लबचे माजी प्रांतपाल ला.डॉ.गुलाबचंद शहा क्लबचे माजी प्रांतपाल एमजेएफ अरविंद कोणसिरसगी,यांचे मार्गदर्शन वअध्यक्ष लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांचे प्रेरणादायी, दूरदृष्टीचे उपक्रमशील आणि समन्वयशील नेतृत्व हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला. कलशेट्टी सरांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या मागील 32 वर्षाच्या अध्यापन सेवेच्या अनुभवातून लायनिस्टिक वर्षात 2025- 26 मध्ये जबाबदार उत्तरदायित्व स्वीकारुन आपल्या क्लब मध्ये एकजूटता ठेवत प्रत्येक उपक्रमात सकारात्मक ऊर्जा, अचूक नियोजन आणि कार्यक्षमतेची प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबने समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला.कलशेट्टी सरांनी क्लबचे सचिव लायन दिनानाथ धुळम व कोषाध्यक्ष लायन सी ए श्रेणीक शहा व पदाधिकाऱ्यांच्यां- सदस्यांच्या सहकार्याने वर्षभर जिथे कमी तिथे आम्ही, जनसेवा हीच सेवा,ही भूमिका समोर ठेवून प्रत्येक सेवा उपक्रमाचे बारकाईने नियोजन,गुणांकनाच्या प्रत्येक निकषाचा सखोल अभ्यास, आवश्यक कागदपत्रांची निर्दोष पूर्तता,वेळेवर अहवाल सादर करणे, प्रत्येक उपक्रमाचे प्रभावी दस्तऐवजीकरण आणि सदस्यांमध्ये सातत्याने समन्वय राखणे या सर्व बाबींमध्ये त्यांनी घेतलेली मेहनत या यशाचा भक्कम पाया ठरली आहे. या ऐतिहासिक यशाचे सिंहाचा वाटा अध्यक्ष लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या समर्पणशील कार्यपद्धतीला, चिकाटीला आणि अविरत परिश्रमांना जातो, असे म्हटल्यास ते मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही.
या संपूर्ण प्रवासात क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचें योगदानही तितकेच मोलाचे असून, सर्वांच्या एकजुटीमुळेच ऍक्टिव्हिटी मध्ये चौथा क्रमांक व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये आठवा क्रमांकाने विजय मिळवणे शक्य झाला आहे.
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलने वर्षभर आरोग्य, शिक्षण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण, पर्यावरण,सामाजिक बांधिलकी, गरजूंना मदत, यंदाची दिवाळी वंचितांसोबत हा अनोखा सेवा कार्य तसेच विविध लोकहितकारी उपक्रम राबवून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.त्याचवेळी प्रशासनातील शिस्त पारदर्शकता,अचूक दस्तऐवजीकरण आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे क्लबने सर्वोच्च स्थानावर आपली मोहोर उमटवली.
अध्यक्ष ला.प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला संपूर्ण टीमच्या सामूहिक समर्पणाला लाभलेले हे यश म्हणजे लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलच्या गौरवशाली इतिहासातील एक सुवर्णपान आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतकांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
"We Serve" या ब्रीदवाक्याला कृतीतून साकार करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, जिथे सक्षम नेतृत्व, समर्पित कार्यकर्ते आणि निःस्वार्थ समाजसेवेची भावना एकत्र येते, तिथे यशाला पर्याय नसतो. वर्षभराच्या सेवा कार्यांमध्ये विविध क्षेत्रातील अनेकांचे, माझ्या क्लबमधील सर्वांचेच बहुमोल सहकार्य लाभल्याबद्दल मी मन:स्वी ऋणी आहे.


