स्वामींचा आशिर्वाद देऊन चेअरमन महेश इंगळे यांनी केला गुणवंत विद्यार्थीनी शिवानी भोसले हिचा गौरव
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
आमच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु.शिवानी नंदकिशोर भोसले हिने ९२% गुणांसह उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे असे मनोगत महाविद्यालयाचे व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
कु.शिवानी भोसले हिच्या या यशाबद्दल मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन शिवानीचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना महेश इंगळे म्हणाले की मुलींनी शिक्षणात असे घवघवीत यश मिळवावे हाच आमचा उद्देश आहे. देवस्थान संचलित महाविद्यालयाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. शिवानी सारख्या विद्यार्थिनी या उद्देशाचे उत्तम उदाहरण आहेत. शिवानीच्या कष्टाला आणि जिद्दीला आमचे वंदन असून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तू अक्कलकोटचे नाव उज्ज्वल करशील स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत अशा प्रकारच्या सदीच्छा व्यक्त केल्या. शिवानीच्या या यशाबद्दल देवस्थान व महाविद्यालय परिवाराकडून तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवानीचे पालक नंदकिशोर भोसले,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


