पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेमध्ये पंढरपूरच्या उपाध्ये अबॅकस अकॅडमीने दैदिप्यमान यश संपादन केले. या स्पर्धेसाठी अकॅडमीच्या तब्बल २२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली असून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या रँकनुसार ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये ईश्वरी अभिजित जानकर हिने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स' हा सर्वोच्च बहुमान पटकावला, तर वेदांत निलेश रोंगे याने 'चॅम्पियन' हा मान मिळवत पंढरपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात तसेच इतर राज्यांतील जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अशा अत्यंत चुरशीच्या स्पर्धेमध्ये उपाध्ये अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ईश्वरी अभिजित जानकर – चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स आणि वेदांत निलेश रोंगे – चॅम्पियन यांच्यासह पुढील विद्यार्थ्यांनी विविध रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रथम क्रमांक (1st Rank):
संयुक्ता निरंजन परदेशी
श्रीकृष्ण मनोज शेजाळ
विवान सोमेश्वर खटावकर
माहेश्वरी सागर चव्हाण
द्वितीय क्रमांक (2nd Rank): 5) सात्विक निरंजन परदेशी
6) ज्ञानेश्वरी दत्तात्रय तरटे
7) अजिंक्या धर्मराज सर्वगोड
8) सौरभ सुभाष शिंदे
9) ओम स्वप्नील कांबळे
10) ओम सुरज खटावकर
11) आराध्या विनोद रोंगे
तृतीय क्रमांक (3rd Rank): 12) वंश रवींद्र ननवरे
13) ऋषिकेश निखिल सुगंधी
14) सार्थक सुभाष शिंदे
15) सत्यजित सागर चव्हाण
16) शरयू सुधाकर माळी
17) स्वरा महेश भिंगारे
18) स्वरा समाधान साळुंखे
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे उपाध्ये अबॅकस अकॅडमीच्या संचालिका गीतांजली उपाध्ये यांचे नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत तसेच मार्गदर्शक सचिनकुमार उपाध्ये यांचे मोलाचे योगदान लाभले.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, संचालिका गीतांजली उपाध्ये आणि मार्गदर्शक सचिनकुमार उपाध्ये यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये पंढरपूरच्या उपाध्ये अबॅकस अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध रँक व ट्रॉफी पटकावल्या.


