अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी नुकतेच पुण्यातील प्रसिद्ध पारस मिल्क मेड बेकरीचे मालक व स्वामी भक्त शुक्ला साहेब यांच्या विनंतीस मान देऊन पारस मिल्क मेड बेकरीस सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान चेअरमन महेश इंगळे यांनी बेकरीमध्ये पाहणी करून बनविल्या जाणाऱ्या विविध खाद्य पदार्थांची संपूर्ण प्रोसेस समजून घेतली. बेकरीतील स्वच्छता, गुणवत्ता आणि उत्पादन प्रक्रियेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते बेकरीचे व्यवस्थापक अभिषेक शुक्ला यांना स्वामींचे कृपावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना
चेअरमन महेश इंगळे यांचे म्हणाले की पारस मिल्क मेड बेकरी सारख्या संस्था दर्जेदार उत्पादनांसोबत स्वच्छता आणि शिस्त पाळतात ही अभिमानाची बाब आहे. अशा व्यावसायिकांनी समाजातील नागरीकांना उत्कृष्ट बेकरी पदार्थ पुरविल्याने गुणवत्ता वाढली आहे. त्यामुळे या बेकरीच्या उत्पादनांना पुणे शहरासह उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश येथेही मोठी मागणी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने बेकरीला अधिक यश मिळो
व आंतरराष्ट्रीय ख्याती लाभो या करीता स्वामी समर्थांचरणी प्रार्थना असल्याचे मनोगत व्यक्त केले. बेकरीच्या व्यवस्थापकांनी भेट दिल्याबद्दल चेअरमन महेश इंगळे यांचे आभार मानले आणि भविष्यात देवस्थानच्या प्रसाद व स्वामी सेवेच्या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. ही सदिच्छा भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, अंकूश केत, तुषार मोरे, दशरथ लोंढे आदी उपस्थित होते.

