बीड प्रतिनिधी तेज न्यूज
लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर समाजसेविका तथा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. ज्योती शिरसाट यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. बीड येथील शासकीय विश्रामगृहात दि. 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्या विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
ही नियुक्ती लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष बी.बी. वैद्य, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष अयुबभाई पठाण, प्रदेश उपाध्यक्ष पंढरी पवार, महिला व बालकल्याण समितीच्या प्रदेश अध्यक्षा कमलताई क्षीरसागर, ग्रामपंचायत विकास समितीच्या प्रदेश उपाध्यक्षा मीराताई डावकर, बीड जिल्हा संघटक संजय कुलकर्णी, शिक्षण समितीचे बबनराव आंधळे तसेच आरोग्य विकास समितीचे अमोल घोडके यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी डॉ. शिरसाट यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. ज्योती शिरसाट या सामाजिक, आरोग्य व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून महिलांच्या विविध प्रश्नांवर शासन-प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेतात. आरोग्य जनजागृती, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, महिला आरोग्य अभियान तसेच गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य राज्यभरात कौतुकास्पद ठरले आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या आणि तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना लोकशाही पत्रकार संघामध्ये "लेडी सिंघम" म्हणून विशेष ओळख मिळाली आहे.
संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष बी.बी. वैद्य यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष प्रतापराव साळुंखे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्षा निलोफर शेख, प्रदेश सचिव गणेश जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष अयुबभाई पठाण, प्रदेश उपाध्यक्ष अनिस कुरेशी, वसीम आजाद, सय्यद साजेद आणि बंडू वैद्य यांच्या सूचनेनुसार अयुबभाई पठाण व पंढरी पवार यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
डॉ. ज्योती शिरसाट यांच्या निवडीबद्दल बीड जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक, पत्रकार, वैद्यकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष बी.बी. वैद्य, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

