पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा जि.प., नप, मनपा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत पंढरपूर येथील सेवानिवृत ज्येष्ठ शिक्षिका अलका गुजरे-जमदाडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
ही निवड दि.13जुलै2026 सोमवार रोजी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. याबतचे निवडपत्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सल्लागार व मार्गदर्शक बाळासाहेब काळे गुरुजी यांच्या हस्ते अलका गुजरे जमदाडे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले गुरुजी,धसाडे गुरुजी, फुलारी गुरुजी, उत्तम जमदाडे गुरुजी, अण्णासाहेब पवार गुरुजी, आणि मा.प्राचार्य हणमंतराव जमदाडे , माळी , खूळपे , जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
अलका गुजरे-जमदाडे यांच्या निवडीबद्दल सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले व संघटनेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

