म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
नामदेव समाज उन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे यांनी राज्याचे ग्रामविकास आता पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराज यांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने समस्त शिंपी समाजा मध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
नामदेव समाज जयंती परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष पदी इंजिनिअर सुनील पोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर पोरे यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिंपी समाजाचे संघटन मजबूत करून श्री संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे ते सातत्याने पाठपुरावा करत होते यासाठी नामदेव समाज उन्नती परिषदेचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर व सर्व कमिटी या स्मारकासाठी प्रयत्न करत होती अखेर इंजिनीयर पोरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून मंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत नामदेव महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी निधी मंजूर करून म्हसवड येथील कार्यक्रमात दिलेला शब्द पूर्ण केला
नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजि.सुनिल पोरे अध्यक्ष संजय नेवासकर व समिती यांनी सोलापूर जिल्हाधिकारीसो यांना सादर केलेल्या प्रस्तावानुसार दि.28 जून 2026 रोजी नियोजन भवन, सोलापूर येथे संपन्न झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर विकास आराखडा जिल्हास्तरीय समितीने पंढरपूर येथील रेल्वेच्या जागेवर संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारकासाठी 99.99 रु. कोटींच्या निधीलाही मंजुरी दिली. आता स्मारक सर्वांच्या सहकार्याने पुर्णत्वास जाणार हीच विठू माऊली ईच्छा आहे.
या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या स्मारका संदर्भात एक कमिटी स्थापन केली जाईल व सदर कमिटीच्या कडून स्मारकासंदर्भात त्यांची मते आजमावून घेतली जातील व सातारा जिल्हा नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी सुचवलेले नामदेव महाराज पायरी दर्शन मार्गत आवश्यक ते बदल करण्यात येतील असे सुतोवाच केले.
या बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पंचायतराज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जयकुमार गोरे जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचेसह संबंधित मंत्री महोदय, आजी - माजी खासदार व आमदार, शासकीय अधिकारी यांचे नामदेव समाजोन्नती परिषद, सर्व शहर व जिल्हा शाखा, फडकरी, वारकरी यांचे वतीने व समस्त शिंपी समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
तर या नियोजित स्मारकासाठी पाठपुरावा करणारे नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर,मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे,उपाध्यक्ष राजन उरुणकर,बाळ आंबेकर सुभाष मुळे , संदीप लचके, ॲड. महेश ढवळे, नासप सातारा जिल्हाध्यक्ष इंजि .सुनील पोरे व सर्व पदाधिकारी यांचे शिंपी समाज बांधवांच्या कडून अभिनंदन होत आहे.


