भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायत कार्यालयात युनियन बँकेचे नूतन शाखाधिकारी प्रशांत आवताडे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भाळवणीचे नूतन केंद्र प्रमुख सतीश शिंदे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
युनियन बँकेचे शाखाधिकारी प्रशांत आवताडे यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य विजय शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला. तसेच नूतन केंद्र प्रमुख सतीश शिंदे यांचा सत्कार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच रणजित जाधव, युवा उद्योजक शकील काझी, प्रशांत माळवदे, बापू वाघमारे, सोमनाथ पाटील, राजाभाऊ शिंदे, राहुल शिंदे, कल्याण गवळी, हर्षद गवळी, विलास लाले यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रशांत आवताडे आणि सतीश शिंदे यांनी मिळालेल्या सन्मानाबद्दल उपस्थितांचे आभार मानले व आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार ग्रामविकास अधिकारी डी. एस. वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


