सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देशाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली आहे, याअनुषंगाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील 7 हजार 694 थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आहे, अशी माहिती सहकारी संस्था सोलापूर चे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली आहे.
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बॅकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे. त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
उत्तर सोलापूर 156, दक्षिण सोलापूर 306, पंढरपूर 857, सांगोला 472, माळशिरस 1009, बार्शी 344, करमाळा 1003, मोहोळ 726, करमाळा 1002, अक्कलकोट 240, मंगळवेढा 1579.


