पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तातडीने कार्यान्वित करुन वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी अशी विनंती करणारे निवेदन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आले.
यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कोल्हापूर येथे २०१६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशनामध्ये विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन चंद्रकांतदादांनी दिले होते याची आठवण ही या निवेदनाच्या माध्यमातून चंद्रकांतदादांना करून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी व सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.


