पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. संतोष भोसले यांचे चिरंजीव ओम संतोष भोसले याने 'एमएचटी-सीईटी' (MHT-CET) परीक्षेत 98.86 पर्सेंटाइल गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते ओमचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ओमने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद असून, त्याने भोसले परिवारासोबतच संपूर्ण परिसराचा गौरव वाढवला आहे, अशा भावना यावेळी सत्कारकर्ते नागेश फाटे यांनी व्यक्त केल्या. तसेच ओमच्या पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भास्कर गायकवाड, डॉक्टर रमेश फाटे, उमेश फाटे, शाहू राऊत, शुभम फाटे आणि शशांक फाटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून चि. ओम याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व त्याला शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे ओम भोसले याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.


