सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुरूषोत्तम मास निमित्ताने " सुधार्मुत कन्नड महिला भजनी मंडळाने 17 मे पासून 14 जून पर्यंत रोज भगवंताचे नामस्मरण महणून रोज सर्व महिला एकत्र येऊन 33 भजन म्हणायचे.
सोलापूरकराच्या कल्याणासाठी, सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडावे. कुठलेही संकट येऊ नये. हरे श्रीनिवास व गुरू राघवेंद्र नामघोष करुन भजन म्हणायचे. या भजनात कर्नाटकातील प्रसिद्ध दासांनी रचलेल्या प्रसिद्ध कन्नड गाणी म्हणायचे.
त्यात राघवेंद्र स्वामी, प्रसन्न वेंकटेश दास, पुरंदर दास, विजय दास, कनक दास, विजय विठठ्ल दास, टीकारायर दास, वादीराज दास, या सर्व संत महात्माने रचलेले गणपती, रूद्र देव, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी, वेंकटेश, राम व क्रिष्णा व गोपी लोल ( गवळण) असे 33 गाणी. मुरारजी पेठ राघवेंद्र स्वामी मठात कार्यक्रम आयोजित केले होते.
शेवटी लोकमाता श्री महालक्ष्मी स्थापना करून. हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन. प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा कार्यक्रम आयोजित करून बक्षीस पण देण्यात आले. शेवटच्या दिवशी राघवेंद्र स्वामींना अभिषेक करून सांगता करण्यात आले.
महिनाभर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. शिला बागेवाडीकर,, डॉ यशश्री कुलकर्णी, सुशिला उमरजी, शोभा बागी, लतिका कुंदरगी, उषा सोन्ना, वीणा यांनी प्रयत्न केले.

