रत्नागिरी प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 5 मुलांचा बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेनंतर लाईफगार्ड आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. या चार मुलांना समुद्राच्या लाटेने कवेत घेतल्याचे म्हटले जात आहे. रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील पर्यटनस्थळी अनेक जण उन्हाळ्यात फिरायला जात असतात. या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या तरुणांनी समुद्रात पोहण्यासाठी उडी मारली. मात्र, या समुद्रातील लाटांचा अंदाज न आल्याने ही मुले बुडू लागली. समुद्रकिनाऱ्यावरील मुलांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक मच्छीमारांनी या वेळी मदतीसाठी समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाल्याने या मुलांचा शोध सुरु आहे.प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरातील ११ जणांचा एक पर्यटक गट फिरायला रत्नागिरी गणपतीपुळे येथे आला होता.
शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक समुद्र किनारी पोहचले.त्यावेळी आठ तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्यातील तीन मुलांना स्थानिकांनी कसेतरी वाचवले मात्र, पाच तरुणांना लाटेने आपल्या कवेत घेतल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते बुडाल्याचे म्हटले जात आहे. किनाऱ्यावरील त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर या मुलांना वाचविण्यासाठी लाईफ गार्ड आणि स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात धाव घेतली. मच्छीमारांची टीम या मुलांचा शोध घेत आहे. परंतू वारा आणि समुद्रात तुफान वारे असल्याने मदतकार्यात अडथळे आणत आहे.
बेपत्ता मुलांची नावे काय ?
ज्या मुलांचा समुद्रात थांगपत्ता लागत नाहीए, त्यांची नावे आदित्य राऊत, यश कांबळे, अनिकेत हिवराळे, प्रेम अदमे आणि आनंद नवराडे अशी असल्याची माहिती मिळाली आहे. हे लोक संभाजीनगरातील रहीवासी असल्याचे म्हटले जात आहे. या पाच लोकांच्या शोधसाठी मदतकार्य सुरु असले तरी समुद्रात भरती तसेच पावसाच्या आगमनाआधी खवळलेला समुद्र असल्याने शोधकार्यात अनेक अडथळे येत आहेत. समुद्रात पर्यटकांनी उतरु नये असे फलक लावूनही पर्यटक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने असे अपघात घडत आहेत.


