पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी येथील वसंतराव काळे MS CIT सेंटर उन्हाळी बॅच चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणाबरोबर AI चे ज्ञान मिळाले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात काम करीत असताना AI कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, वैज्ञानिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो. तसचे उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थिनी आपला वेळ वाया न घालवता AI चा कोर्स करावा असे सांगितले.
इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली ज्ञानदा कमलकिशोर काळे यांनी MSCIT व AI साठी प्रवेश घेतला आहे. कमी वयामध्ये AI चे ज्ञान संपादन करण्याची तिची आवड कौतुकास्पद आहे.तसेच AI कोर्स पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक MSCIT सेंटर प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे , यावेळी संकुलातील प्राचार्य शिवाजीराव शेंडगे , संजय कुलकर्णी ,युवराज काळे ,स्वाती धावणे, विद्या कुचेकर व सर्व स्टॉप उपस्थित होते.


