अंतराळयान निर्मितीसाठी हातभार लावणाऱ्या विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञाची दुर्मिळ भेट
शास्त्रज्ञ म्हणजे दुसरे देव,माणसाला मिळालेली समृद्ध ठेव...
नुकतीच DRDO चे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आ.काशिनाथ देवधर यांचा आमच्या घरी येण्याचा योग आला.मागे काही वर्षांपूर्वी अंतराळामध्ये जे यान झेपावले त्यामध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे.मा अब्दुल कलाम यांचे ते उजवे हातच होते म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
देवधर साहेबांच्या अंतराळातील गप्पा व त्यांचे देशप्रेम ऐकताना आम्ही भारावून गेलो होतो. साध्या साध्या गोष्टी विज्ञानाने किती भारलेल्या आहेत याची जवळून प्रचिती आली. ते सेवानिवृत्त झाले तरीही विविध संस्था, शाळांमध्ये सभा व व्याख्यानाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध करण्याचा विविध कार्यक्रमाद्वारे प्रामाणिक प्रयत्न करून विज्ञाननिष्ठ युवक बनविण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. त्यांची आजची चर्चा ऐकून आपण प्रत्यक्ष अंतराळातच प्रवास केल्याचा भास होत होता.
ते विज्ञाननिष्ठ असले तरी खूप हळवेही असल्याचा अनुभव आला. आमची चर्चा रंगात आली असता माझे पती आ. तोंडे साहेब यांनीही एका हृदयस्पर्शी विना मोबदला कार्य करणाऱ्या शिक्षिकेची कथा सांगताच अक्षरशः देवधर साहेबांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा अनावर झाल्या.
सोबतच त्यांच्या रंजक व हृदयस्पर्शी अनुभवाची मुलाखतही आम्ही घेतली. अशा देशासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक युगपुरुषाला हजारो वर्षाचे आयुष्य लाभावे याच शुभकामना.
गप्पांचा शेवट त्यांचा गोड शाही सत्कार करून केला. त्यांनीही एक छान पुस्तक भेट दिले.
लेखन कवियत्री स्वाती वाल्मीकराव तोंडे पाटील.

