भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील स्वाती शरद सुळे हिची मुंबईतील सिफि टेक्नॉलॉजी कंपनीत निवड झाल्याबद्दल अकलूज वैभवचे संपादक भाग्यवंत नायकुडे यांच्या हस्ते शाल,पेढे, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी माळशिरस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीष शेटे ,बागायतदार शरद सुळे,प्राची प्रशांत माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाग्यवंत नायकुडे यांनी स्वाती सुळे हिच्या भावी काळातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्वाती सुळे हिचे प्राथमिक शिक्षण शेंडगेवाडी येथे झाले.तसेच माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी व इजिनिअरिंगचे शिक्षण शासकीय तंत्र निकेतन कराड येथे सुरू आहे.कॉलेज कॅम्पस मधून मुंबई येथे निवड झाली आहे.
हि निवड झाल्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे. यावेळी आभार ओंकार माळवदे यांनी मानले.

