सुस्ते प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेमध्ये आज बारामती कॅटल फिड, बारामती यांचे वतीने श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते, प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तब्बल 5000 वह्या व 1 पेन तसेच प्रत्येक विद्यार्थिनीसाठी सॅनिटरी नॅपकिन यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक मा.अनिरुद्धभाऊ सालविठ्ठल व ए. एस. एम. हिंदुस्तान फीड्स चे मा.अतुल पिसाळ , हिंदुस्तान फिड्सचे विक्री अधिकारी अतुल राऊत तसेच गणेश शेलार व डॉ. संदीप पांढरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश कटकधोंड होते.
यावेळी बारामती कॅटल फीड या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे कार्य, धवल क्रांती, शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या योजना व या व्यवसायाबरोबरच कंपनी करत असलेल्या समाज हिताच्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरां सोबतच सप्तशृंगी फायनान्सचे अतुल चव्हाण, तानाजी सालविठ्ठल, समाधान चव्हाण, संतोष चव्हाण, युवराज नागटिळक, जीवन चव्हाण, संजय बोबडे, रमेश चव्हाण, छगन चव्हाण गुरुजी, हनुमंत आप्पा चव्हाण, तसेच सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचे उपस्थितीत व त्यांच्याही हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक सप्तशृंगी पशुखाद्य व दूध संकलन केंद्र सुस्तेचे चेअरमन समाधान चव्हाण, बायो स्केअर फीड फार्मर चे चेअरमन तानाजी सालविठ्ठल, लोकसेवा पशुखाद्य फार्मचे संतोष चव्हाण यांच्या व गावातील प्रतिष्ठित महिला यांच्या हस्तेही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रशालेचे उदात्त दाते कै.जालिंदर ज्योती पवार यांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त उपस्थितांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ लिपिक राजकुमार ढगे, शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत चंदनशिवे व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैनुद्दीन शेख यांनी केले. अध्यक्ष निवड नितीन वायदंडे तर त्यास अनुमोदन प्रतिभा जावीर यांनी दिले. आभार राजेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.

