संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
अकलूज स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पल्स २०२६' या वार्षिक वैद्यकीय परिषदेची अत्यंत यशस्वी सांगता झाली." गुंतागुंतचे गरोदरपण " या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित या परिषदेला शंभरहून अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन्स आणि भूलतज्ज्ञांनी नोंदणी करून उत्तम प्रतिसाद दिला.
अकलूज येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये अकलूज स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पल्स २०२६' या वार्षिक वैद्यकीय परिषदेची अत्यंत यशस्वी सांगता झाली." या ज्ञानवर्धक परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमोग्सच्या विश्वस्त डॉ.आशा दलाल (स्त्रीरोगतज्ञ,मुंबई) उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अमोग्सचे विद्यमान अध्यक्ष डॉ.अमेय पुरंदरे (स्त्रीरोगतज्ञ मुंबई) यांनी उपस्थिती दर्शवली.या परिषदेचे यशस्वी नियोजन अकलूज स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ.रेवती राणे (स्त्रीरोगतज्ज्ञ अकलूज )यांनी केले .
या परिषदेच्या अंतर्गत डॉ. रोहिणी देशपांडे (स्त्रीरोगतज्ज्ञ सोलापूर),डॉ कविता कांबळे (स्त्रीरोगतज्ज्ञ करमाळा) यांनी चर्चा सत्र घेतले ज्यात डॉ.नितीन राणे (फिजिशियन अकलूज),डॉ निनाद फडे (फिजिशियन अकलूज),डॉ सुदेश दोशी (स्त्रीरोगतज्ज्ञ,पंढरपूर), डॉ मोनिका मिसाळ (स्त्रीरोगतज्ज्ञ अकलूज),डॉ भारत पवार (स्त्रीरोगतज्ज्ञ माळशिरस),डॉ तृप्ती सिद (भूलतज्ज्ञ अकलूज) यांनी सहभाग घेतला.
डॉ. रेवती राणे यांनी गरोदरपणातील निगेटिव्ह रक्तगटाची गुंतागुंत आणि बारकावे उलगडून सांगितले तर डॉ.गिरीश कुमठेकर (स्त्रीरोगतज्ञ सोलापूर) यांनी माता मृत्यू संदर्भातील वैद्यकीय-कायदेशीर पैलूंवर प्रकाश टाकला.डॉ.संदीप नेमाणी (रक्ताविकार तज्ञ सांगली) यांनी रक्त आणि रक्त उत्पादनांचा योग्य वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले,डॉ.आशा दलाल यांनी चाळीशीनंतरच्या मातृत्वाविषयी आधुनिक दृष्टिकोन मांडला.डॉ. अमेय पुरंदरे यांनी डॉ.व्ही.एन. शिरोडकर ओरेशन अंतर्गत प्रसूती दरम्यान अतिदक्षता या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.'कोड ब्लू' वर्कशॉप या परिषदेचे आकर्षण ठरले.डॉ.राजेंद्र पाटील (भूलतज्ज्ञ पुणे) आणि भूलतज्ज्ञ डॉ.सीमा वाळके (भूलतज्ज्ञ पुणे), डॉ.पार्थ कुलकर्णी (भूलतज्ज्ञ अकलूज) यांनी डमीवर प्रात्यक्षिके करून दाखवली.डॉक्टरांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण कसे वाचवावेत याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
या परिषदेमध्ये डॉ.वंदना गांधी यांना ( स्त्रीरोग तज्ज्ञ अकलूज) यांचा डॉ मुग्धा विश्वास तांबे AOGS गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.ही परिषद यशस्वी करण्यासाठी सचिव डॉ.कविता कांबळे,उपसचिव डॉ. अमित चोपडे (स्त्रीरोगतज्ज्ञ टेंभुर्णी) आणि खजिनदार डॉ. विशाल शेटे (स्त्रीरोगतज्ज्ञ करमाळा) यांनी विशेष परिश्रम घेतले.मातृ व बाल आरोग्यामध्ये गुंतागुंतीच्या प्रकरणा हाताळण्यासाठी ही परिषद सर्व सहभागी डॉक्टरांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरली.

