अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
स्वामी सेवेच्या माध्यमातून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील सेवाकार्याचे भाग्य व सलग ६ व्यांदा नगरसेवक हा बहुमान महेश इंगळे यांच्या जीवनाला लाभलेले स्वामी कॄपेचे वरदान असल्याचे मनोगत गोगावचे सरपंच मधुकर सुरवसे यांनी व्यक्त केले.
आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात गायिका कनिष्का शिवपुजे यांच्या भक्ती संगीत सेवेपुर्वी गोगावचे सरपंच मधुकर सुरवसे परिवाराच्या वतीने देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा देवस्थान मधील सेवा कार्याबद्दल व सलग ६ वेळा नगरसेवक पदी निवडून आल्याबद्दल सरपंच मधुकर सुरवसे व त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता सुरवसे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार केला. यावेळी सरपंच मधुकर सुरवसे बोलत होते.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रशांत गुरव, रमेश शिंदे , प्रसाद पाटील सर, बाळासाहेब कुलकर्णी, प्रा.शिवशरण अचलेर, ओंकार पाठक, भोसले सर, विवेक कानडे, श्रीशैल गवंडी व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

