श्री स्वामी दर्शनानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे मनोगत.
नगरसेवक - चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सपत्निक सत्कार.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी स्वामींचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. सात्विक वर्तन, सात्विक आहार यांचे जीवनात विशेष महत्व आहे. खोटे बोलणे टाळावे आणि गुरुवारी स्वामींची विशेष सेवा करावी.
अशी जीवनशैली प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. यातून मनुष्याच्या अंगी निस्सीम सेवाभाव उद्भवते. अशा सेवाभावाने स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा दृष्टीचा वर्षाव करतात, म्हणून निस्सीम श्रद्धा, विश्वास आणि सेवेद्वारे श्री स्वामींची कृपादृष्टी प्राप्त होते असे मनोगत भारतीय प्रशासन सेवेतील सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सपत्निक भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
या प्रसंगी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांचा सपत्निक श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी उपस्थित स्वामी भक्तांना स्वामी भक्ती संदर्भात मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम बोलत होते. पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीची भक्ती, सेवा आणि उपक्रम या ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे अवतार कार्य आहेत.
यानिमीत्ताने श्री स्वामी समर्थांच्या या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्ती, सेवा, उपक्रम या कार्यांची धुरा समर्थपणे पेलण्यास महेश इंगळे यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ असल्याचे व आमच्या काळजीवाहू शुभेच्छा त्यांच्या पाठीशी नेहमीच असल्याचे मनोगत व्यक्त केले. मंदीर समितीच्या वतीने येथे करण्यात आलेल्या आदरतिथ्य व श्री स्वामी दर्शनाची व्यवस्था पाहून नगरसेवक व मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे विशेष आभार मानले.
यावेळी दयानंद परिचारक, डिकसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

