पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सव समितीच्या वतीने 14/04/2026 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवतीर्थ पंढरपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी राज सर्वगोड यांनी दिली आहे.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्ह्यातील पहिली पिंक रिक्षा चालक सोनाली अरुण दळवी यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी यावेळी समाजसेविका तृप्ती खरे, जिल्हा परिषद सदस्य दुर्गा अंकुशराव माजी नगराध्यक्ष साधना भोसले नगरसेविका उज्वला भालेराव नगरसेविका शकुंतला नडगिरे माजी उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे नगरसेविका अन्यथा ढोबळे पंचायत समिती सदस्य सावली बंगाळे , पंचायत समिती सदस्य अक्काताई लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर जळगावकर महाराज हे आहेत तर माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी भीम गीत कवी वामनराव कर्डक गीत रामाई हा कार्यक्रम विलास जगधने सादर करणार आहेत.अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत चंदनशिवे यांनी दिली आहे.
तर या कार्यक्रमास आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समिती सचिव ज्ञानेश्वर कांबळे व अनिल ननवरे यांनी केले आहे.



